सदरचा कार्यक्रम पहाटे ५ पासून सुरू होऊन सकाळी ९ पर्यंत चालला. सर्वप्रथम सकाळी थोडासा व्यायाम घेण्यात आला, व्यायामानंतर छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व आरोग्य तपासणी शिबिरास सुरुवात करण्यात आली. सदरील कार्यक्रमांमध्ये उपस्थित सर्वांचे मोफत आरोग्य तपासणी करून त्यांना आरोग्य विषयक मार्गदर्शन करण्यात आले.
त्याचबरोबर नियमित व्यायाम ,कसा करावा त्याचे होणारे फायदे आणि यासाठी नियमितपणे रोज सकाळी सर्वांसाठी पाच वाजल्यापासून याबाबत प्रत्यक्ष कृतिसह मागदर्शन केले जात आहे याचाही लाभ सर्वांनी घ्यावा असेही सांगण्यात आले
त्याचबरोबर आरोग्यदायी जीवनशैली कशी असावी व आपला आहार कसा असावा याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले हे मार्गदर्शन करण्यासाठी पाली येथील मित्र वेलनेस कोच श्री दिनेश बांगर सर, श्री हरिदास गंगथडे सर श्री दत्तात्रेय फुंदे सर श्री सुदर्शन आंधळे सर व श्री अनिल घाडगे सर हे उपस्थित होते
सदरील आरोग्य शिबिरास मार्गदर्शन करणारे सर्व शिक्षक उपस्थित सर्व शिक्षक बांधव व सदर कार्यक्रमासाठी जागा उपलब्ध करून दिलेले गो म वेदक कॉलेजचे मा. अध्यक्ष, सचिव व प्राचार्य या सर्वांचे मनःपूर्वक हार्दिक आभार
श्री.प्रमोद दिगंबर मोरे
प्राथमिक शिक्षक
रायगड जिल्हा परिषद शाळा रहाटाडवाडी
ता.तळा जि.रायगड