Monday, June 17, 2019

शाळापूर्व तयारी व शाळा शुभारंभ रहाटाडवाडी

रायगड जिल्हा परिषद शाळा रहाटाडवाडी

शाळापूर्व तयारी व शाळा शुभारंभ


*येथे दि.१६/६/२०१९* रोजी शाळेचे माजी मुख्याध्यापक *श्री.काटकर सर* यांचा ग्रामस्थ मंडळ मुंबईकर मंडळ व महिला मंडळ यांच्या तर्फे *निरोप समारंभाचे* आयोजन करण्यात आले. तद्नंतर *जय अंबे नवरात्रौत्सव मंडळ रहाटाडवाडी* यांच्या तर्फे रहाटाडवाडी शाळेतील सर्व मुलांना *शालेय साहित्य व दप्तरांचे वाटप* करण्यात आले.त्यानंतर सर्व ग्रामस्थांच्या हस्ते सर्व मुलांना *शालेय मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप* करण्यात आले. शालेय व्यवस्थापन समितीची तसेच शिक्षक पालक समितीचीही *सभा* पार पडली.





*दि.१७/६/२०१९ वार सोमवार.*
प्रभातफेरी व प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. *नवागतांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत* करण्यात आले.
शाळेचे *मुख्याध्यापक* श्री.पालवे सर व *शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्षा* सौ. रश्मी वरणकर  *smc उपाध्यक्षा* लिला शिंगाडे *गावकी अध्यक्ष* नारायण कासार *उपाध्यक्ष* श्री.हरिश्चंद्र पवार *खजिनदार* श्री यशवंत पवार *सचिव* मनवल गुरुजी व *माजी अध्यक्ष* बाळकृष्ण धुमाळ  यांच्या हस्ते *श्री मोरे सरांनी* तयार केलेल्या *वेबसाईट चे उद्घाटन* करण्यात आले.
*शाळेची वेबसाईट*
https://pramodmoresirblog2.blogspot.com/

त्यानंतर परिपाठ व वर्गाध्यापनास सुरुवात झाली. दुपारच्या सत्रास *शाळा शुभारंभ भेट* म्हणून बी.आर.सीचे *श्री.सिरसट सर* यांनी भेट दिली. शालेय पोषण आहारात मुलांना *आज स्वीट म्हणून जिलेबीचे वाटप* करण्यात आले.

त्यानंतर मुलांना आज *संगणक प्राथमिक ओळख चालू करणे बंद करणे सांगण्यात आले*. त्यानंतर मुलांचे पी.सी.च्या साहाय्याने शब्द वाचन घेण्यात आले व शेवटी मुलांना संगणकावर माऊसचा वापर करुन *रंगभरण* कसे करायचे ते शिकवण्यात आले. मुलांना संगणक हाताळण्यास मिळाल्यामुळे ती खूप *आनंदात* होती.


🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

No comments:

Post a Comment