Thursday, June 29, 2023

Sunday, June 11, 2023

वडघर (मुद्रे ) हायस्कूल चा 100% निकाल.

 वडघर (मुद्रे ) हायस्कूल चा 100% निकाल.

 


(माणगाव)

शिक्षणाबरोबरच संस्कार व संस्कृती ची जपणूक करणाऱ्या छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण संचलित सरस्वती विदया मंदिर वडघर मुद्रे,ता.माणगाव या याळेचा इ.10वी मार्च 2023 चा निकाल 100% लागला असून भूमी हरिश्चंद्र धुमाळ हिने 95.80% गुण मिळवून प्रथम येण्याचा मान मिळवला.तर द्वितीय क्रमांक सुष्टी भिवा पवार हिला 85.20% गुण मिळवून प्राप्त केला व मिनाक्षी नरेश धुमाळ हिने 84.20% गुण मिळवून तिसरा क्रमांक प्राप्त केला आहे.

       शाळेचा सलग 13 वर्षे 100% निकाल लागला असून यावर्षी शाळेने निकालात वैयक्तिक गुणांमध्ये उच्चांक गाठला आहे.

       या सर्व यशस्वी विदयार्थ्यांचे शालेय समिती अध्यक्ष महादेव जाधव सर यांच्या सह सदस्य विश्वास सोनवणे, राजाराम पाटील, निमंत्रित सदस्य डॉ.दीपक देशमुख ,बाबाजी रिकामे यांनीही अभिनंदन केले.

     शाळेचे मुख्याध्यापक नागनाथ सुर्वे यांनीही सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले. यशाची ही परंपरा कायम ठेवल्याने सर्वच यशस्वी विद्यार्थी व शिक्षकांचे पंचक्रोशीत अभिनंदन होत आहे.

रहाटाडवाडी शाळेच्या माजी विद्यार्थ्याचे दहावी बोर्ड परीक्षेत सुयश

 

रहाटाडवाडी शाळेच्या माजी विद्यार्थ्याचे दहावी बोर्ड परीक्षेत सुयश




रहाटाडवाडी शाळेचा माजी विद्यार्थी प्रविण प्रकाश ढेबे याने दहावी बोर्ड परीक्षेत 92.60 % गुण घेऊन घवघवीत यश संपादन केले आहे.या यशाचे श्रेय रा.जि.प.शाळा रहाटाडवाडी शाळेतील इ.पहिली ते चौथीचे शिक्षक श्री.शिवदास काटकर सर व श्री.संजय पालवे सरांना आहे. याच शाळेत प्रविणला शिक्षणाची गोडी लागली असे त्याचे वडील प्रकाश ढेबे यांनी सांगितले. अतिशय दुर्गम भागातील व गरीब कुटुंबातील असूनही कठीण मेहनत,अभ्यासातील चिकाटी व जिद्द यामुळे प्रविणने आपले व आपल्या आई वडीलांचे नाव उज्ज्वल केले आहे. 

                    ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकून मुंबई येथील भैरव विद्यालय घाटकोपर शाळेतून 92.60 % गुण मिळवले.या शाळेतील वर्षा चोपदार मॅडम,संगीता सोनावणे मॅडम,संगीता चव्हाण मॅडम,उज्ज्वला वाव्हळ मॅडम,सुनिता बारसिंगे मॅडम,शामल देशपांडे मॅडम,वंदना तिवारी मॅडम,अनिता खाडे मॅडम, श्री.बाळू नेहे सर,श्री.अमोल गोडसे सर व वंदना गोडसे मॅडम यांचे अनमोल मार्गदर्शन मिळाले.

     रहाटाडवाडी व रहाटाड धनगरवाडीतील ग्रामस्थांकडून प्रविणच्या या यशाचे खूप कौतुक होत आहे. आई वडील व सर्व नातेवाईकांना गगनात मावेनासा असा आनंद झालेला आहे. व या प्रसंगी प्रविण व प्रविणच्या आई - वडिलांनी त्याच्या जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांना या यशाचे न विसरता श्रेय दिले आहे.